लेफ्टनंट गव्हर्नरचा सैनिकांशी संवाद
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी कुपवाडा येथे जाऊन तेथील सैनिकांची भेट घेतली आहे. त्यांनी कुपवाडा जिल्ह्याच्या तंगधर क्षेत्राचा दौरा शनिवारी केला. भारताच्या सिंदूर अभियानात पाकिस्तानने केलेल्या सततच्या गोळीबारामुळे या भागावर परिणाम झाला होता. येथील अनेक घरांची या गोळीबारात हानी झाली होती. मनोज सिन्हा यांनी या भागातील स्थानिक नागरीकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. हानी किती प्रमाणात झाली आहे, याचा आढावा त्यांनी घेतला. या भागात घरांची हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी नंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. आपल्या आढाव्याचा अहवाल ते केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारला सादर करणार आहेत. सिन्हा यांनी कुपवाडा विभागातील सैनिक तळावर जाऊन तेथील सैनिकांचीही विचारपूस केली. पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण हल्ल्यानंतरची या भागातील सेनातळाची कोणतीही हानी झालेली नाही. तथापि, ड्रोन्सचे भाग आणि हवेतच उडालेल्या क्षेपणास्त्रांचे भाग घरांवर पडून घरांची हानी झाली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात का भागातील काही नागरीकांना प्राण गमवावे लागले आहेत. उपराज्यपालांनी सर्व पिडितांची विचारपूस करुन त्यांना आणि कुटुंबियांना दिलासा दिला आहे.
Comments are closed.