Relationship Tips : हॅपी मॅरिड लाइफसाठी हे नियम पाळाच !

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. सर्वत्र प्रेमात बुडलेली मंडळी लग्नाच्या बेडित अडकताना दिसत आहेत. आपणही या नवदाम्पत्याला हॅपी मॅरिड लाइफ म्हणत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. पण, मॅरिड लाइफ हॅपी होण्यासाठी केवळ शुभेच्छा कामाच्या नसून नवदाम्पत्याने एकमेकांना सांभाळत काही नियम पाळणे गरजेचं आहे. नवरा-बायकोचं नातं हे विश्वास, प्रेम, आपुलकी यावर अवलंबून असते. कारण नात्यात गैरसमज उभा राहिला की, नातं संपायला वेळ लागत नाही. आपण हल्ली आसपास अशी अनेक जोडपी बघतो, ज्याचं काही क्षुल्लक कारणांमुळे अगदी घटस्फोटांपर्यंत प्रकरण जाते. दिवसेंदिवस तर घटस्फोटांच्या प्रकरणात वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत, हॅपी मॅरिड लाइफसाठी नवदाम्पत्यांने आणि लग्न होऊन अनेक वर्ष झालेल्या जोडप्याने काही नियम पाळायलाच हवेत.

  • चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी एकमेकांना वेळ देणे गरजेचं असते. त्यामुळे दोघेही नोकरी करत असाल किंवा बिझनेस करत असाल तरी दिवसातून काही वेळ हा दोघांसाठी काढणे आवश्यक आहे.
  • साधारणपणे, अनेक घरात महिला बाहेरील आणि घरातील दोन्ही कामे पाहतात. अशा परिस्थितीत, दोघेही वर्किंग असाल तर घरातील कामे वाटून घ्यावीत. असे केल्याने कामाचा लोड एकावर येणार नाही.सुट्टीच्या दिवशी घरातील कामे दोघांनी मिळून करावीत. यामुळे एकमेंकाना वेळ मिळतो आणि कामही होते.
  • नात्यामध्ये दोघांनीही एकमेंकाना पर्सनल स्पेस देणे आवश्यक आहे. अन्यथा नात्यात अडचणी येऊ शकतात.
  • नाते कोणतेही असो ऍ़जेस्टमेंट करणे गरजेचं आहे. एकमेकांसाठी ऍ़जेस्टमेंट केल्याने नाते अजून घट्ट होते. काहींना ऍ़जेस्टमेंट करणे म्हणजे कमीपणा वाटतो. पण, असे न करता नात्यात ऍ़जेस्टमेंट करण्याची तयारी असलीच पाहिजे. हा एक हॅप्पी मॅरिड लाइफचा महत्त्वाचा नियम आहे.
  • नात्यांमध्ये व्यवहार एकमेंकाना सांगणे गरजेचे आहे. कारण कोणतेही नाते विश्वासावर आणि आपुलकीवर उभं असतं. त्यामुळे कोणत्याही व्यवहार हा पती-पत्नीने एकमेकांपासून लपवला नाही पाहिजे.
  • अनेकांना वाटते प्रेम म्हणजेच सर्व काही आहे. पण, प्रेमासोबत एकमेंकाचा आदर करणेही गरजेचं आहे. नुकतंच लग्न झालेल्या कपल्सने हा नियमही लक्षात घ्यायला हवा.
  • भांडणे होणे साहजिक आहे. पण, तुमचे भांडण जास्त ताणले जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे एकमेंकाना क्षमा करण्याची सवय लावा.
  • एकमेकांच्या आई-वडिलांचा आदर करा. बहुतेकदा मुलीने सासु-सासऱ्यांचा आदर करावा अशी अपेक्षा असते, पण मुलगा मुलीच्या आईवडिलांची साधी चौकशी देखील करत नाही, असे चित्र दिसते, जे पूर्णत: चुकिचे आहे.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.