मेस्सीकडून कुलदीप यादवला अर्जेंटिनाची जर्सी भेट

अलीकडेच हिंदुस्थान दौऱयावर आलेला अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने क्रिकेटपटू कुलदीप यादवला अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली. मेस्सीची ऑटोग्राफ असलेली जर्सी आणि फुटबॉलपटूसोबतचा फोटो कुलदीपने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फिरकीपटू कुलदीप फुटबॉलचा मोठा चाहता असून त्याने अनेकदा मेस्सी आणि एफसी बार्सिलोनाची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, मेस्सीने रोड्रिगो डी पॉल आणि लुइस सुआरेज यांच्यासोबत कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या चार शहरांना भेट दिली. त्याची ‘गोट इंडिया टूर 2025’ ही मोहीम अनेक कारणांनी खास ठरली. क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानात सुपरस्टार मेस्सीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली. मेस्सीनेदेखील हिंदुस्थानची टी-20 जर्सी परिधान करून चाहत्यांची मने जिंकली. हिंदुस्थानची बॉक्सिंग स्टार निखत जरीन आणि महिला विश्वचषक विजेती वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर यांनाही मेस्सीसोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.

Comments are closed.