कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप-5 फलंदाज! पहा कोण आहे पहिल्या स्थानावर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कसोटी क्रिकेट सर्वात कठीण मानला जातो. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांच्या संयम, तंत्र आणि मानसिक कणखरपणाची खरी परीक्षा होते. या फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहणे हीच अनेकदा विजयाची गुरुकिल्ली ठरते. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांनी हे काम केले आहे, ज्यांनी केवळ धावाच केल्या नाहीत, तर हजारो चेंडूंचा सामना करत आपल्या संघासाठी भिंत बनून क्रीजवर टिकून राहिले आहेत. यात भारतीय फलंदाज राहुल द्रविड पहिल्या क्रमांकावर आहे. द्रविडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 31,258 चेंडू खेळले आहेत. (Most Balls Faced in Test Cricket)

5) ऍलन बॉर्डर- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज ऍलन बॉर्डर आहेत. बॉर्डरने 156 कसोटी सामन्यांमध्ये 27,002 चेंडू खेळले आहेत. बॉर्डरने 10,937 धावा केल्या आहेत. बॉर्डरने या काळात 63 अर्धशतकांसह 27 शतके झळकावली आहेत.

)) शिवनारायण चंद्रपॉल- या यादीत चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आहेत. चंद्रपॉलने 164 कसोटी सामन्यांमध्ये 27,395 चेंडूंचा सामना केला आहे. या काळात त्याने 11,867 धावा केल्या आहेत. चंद्रपॉलने कसोटीत 66 अर्धशतकांसह 30 शतके ठोकली आहेत.

3) जॅक कॅलिस- तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस आहेत. कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये 28,903 चेंडू खेळले आहेत. कॅलिसने कसोटीत 13,289 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 58 अर्धशतकांसह 45 शतके झळकावली आहेत.

2) सचिन तेंडुलकर- या यादीत दुसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर आहेत. सचिनने 200 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 29,437 चेंडूंचा सामना केला आहे. या काळात त्याने 53.78च्या सरासरीने 15,921 धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 68 अर्धशतकांसह 51 शतके झळकावली आहेत.

1) राहुल द्रविड- द्रविडने आपल्या 164 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 31,258 चेंडूंचा सामना केला आहे. या काळात द्रविडने 52.31च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. द्रविडने कसोटी कारकिर्दीत 63 अर्धशतकांसह 36 शतके झळकावली आहेत.

Comments are closed.