Indian Spices :भारतीय मसाल्यांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना
विविध मसाल्यांसाठी भारत देश जगभरात ओळखला जातो. जगभरातून भारतीय मसाल्यांना विशेष मागणी असते. या मसाल्यांमुळे जेवणाची चव दुप्पट होतेच शिवाय आरोग्यही सुधारते. या मसाल्यांमध्ये ऍटी-ऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी गुणधर्म, पाचक गुणधर्म यासारखी शरीराला आवश्यक अशी गुणधर्म आढळतात. भारतीय मसाल्यांचा आयुर्वेदाशी खूप गहन संबंध आहे. आयुर्वेदानुसार, मसाल्यातील विविध गुणधर्मामुळे अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात, या मसाल्यांचे औषधी गुणधर्म…
हळद (Turmeric)

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो, जो ऍटी-ऑक्सिडंट आणि ऍटी-इन्फ्लेमेटरी म्हणून कार्य करतो. हळदीतील या गुणधर्मांमुळे संधिवात, सांधेदुखी आणि इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते.
दालचिनी (Cinnamon)

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरते. याशिवाय कॅन्सरचा धोका कमी होण्यासाठी दालचिनीचे सेवन फायदेशीर असते.
जिरे

जिऱ्यामध्ये लोह असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत मिळते.
हिंग (आसफोएटिडा)

गॅस, अपचन यासारख्या समस्या कमी होण्यासाठी हिंग महत्त्वाची भूमिका निभावते.
जायफळ (Nutmeg)

शांत झोपेसाठी जायफळ उपयुक्त असते. याशिवाय जायफळातील एटीसेप्टीक आणि इनफ्लेमेटरी गुणधर्म स्किन क्लिजिंगचे काम करते.
लवंग (Clove)

लवंगातील प्रोटिन, एनर्जी, व्हिटॅमिन्स, फायबर आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. लवंगाच्या सेवनाने पचनसंस्था सुरळीत काम करते आणि चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते.
वेलची (Cardamom)

किडनी स्टोन, युरिक ऍसिडची समस्या असेल तर वेलचीचे सेवन करावे. वेलचीचे काही दिवस सतत सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ कमी होण्यास मदत मिळते.
काळी मिरी (Black pepper)

तमालपत्र (Bay leaf)

तमालपत्रातील गुणधर्मामुळे स्ट्रेस हार्मोन्स संतुलित होतो आणि ताणापासून मुक्ती मिळते. याशिवाय श्वसनासंबंधी आजारापासूंन मुक्ती मिळण्यासाठी तमालपत्र खाणे फायद्याचे ठरते.
धणे पावडर (Cओरिअन्डर बियाणे)

धणे थंड प्रकृतीचे असतात. याच्या नियमित सेवनाने पोटातील संक्रमण, आम्लपित्त आणि जळजळ कमी होते.
आले (Ginger)

आल्यामुळे पचन व्यवस्थित होते. सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून आल्याचा वापर केला जातो.
हेही पाहा –
Comments are closed.