Career After 10th : दहावी नंतर करा हे कोर्सेस, होईल लाईफ सेट
हल्ली दहावीनंतर करिअर घडवण्यासाठी अनेक नवनवीन पर्याय खूले झाले आहेत. केवळ करिअर करण्यासाठी सायन्स, कॉमर्स, आर्टस या शाखा राहिल्या नसून अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत. ज्यांना कमी वेळात नोकरी करून लाइफ सेट करायची असल्यास त्यांच्यासाठी हे कोर्सेस उत्तम आहेत. आज आपण दहावीनंतर करता येतील अशा कोर्सेसची माहिती घेणार आहोत. या कोर्सेसनंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल किंवा ते स्वत:चा व्यवसाय देखील करू शकतील. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात 10 वी नंतर कोणते कोर्सेस करता येतील
स्टेनोग्राफी
तुम्हाला जर शॉर्ट टर्म कोर्स करायचा असेल तर तुम्ही डिप्लोमा इन स्टेनोग्राफीमध्ये कोर्स करू शकता. या कोर्समध्ये स्टेनोग्राफीसोबत कॉम्प्युटर आणि टायपिंग शिकवले जाते. सरकारी नोकरी करायची इच्छा असल्यास स्टेनोग्राफीचा कोर्स करावा.
ललित कला
हल्ली सर्वात ट्रेंडिग कोर्समध्ये हा कोर्स आहे. जर तुम्हाला आर्ट ऍंड क्राफ्टची आवड आणि समज असेल तर फाइट आर्टस क्षेत्रात डिप्लोमा करून लाइफ सेट करू शकता. दहावीनंतर 6 ते 1 वर्षांचा हा कोर्स असतो. हा कोर्स केल्यानंतर आर्ट टीचर, आर्ट लायसन्स ऑफिसर या पदांसाठी भरती होता येते. दरमहा 40 ते 50 हजार पगार मिळू शकतो.
हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management)
दहावी केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करता येईल. दीड ते 2 वर्षाच्या डिप्लोमानंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी मिळवता येईल. तुम्हाला जर विविध भाषा अवगत असतील तर हे क्षेत्र उत्तम राहील.
हार्डवेअर आणि नेटवर्किंग (Hardware And Networking)
टेक्नोलॉजीच्या युगात लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल आदी उपकरणे वापरण्यात येतात. त्यामुळे दिवसेंदिवस हार्डवेअर तज्ज्ञांची मागणीही वाढत आहे.
मध्ये
दहावीनंतर आयटीआयही करता येईल. रेल्वेसह अनेक कारखाने आणि प्लांटमध्ये नोकरी मिळवता येते.
कला शिक्षक
तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. अनेक खासगी संस्थामध्ये किंवा शाळा-कॉलेजमध्ये तुम्ही नोकरी करू शकता.
मल्टीमीडिया मध्ये डिप्लोमा
दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डिप्लोमा इन मल्टिमीडिया हा कोर्स करून भरमसाठ पगाराची नोकरी मिळवू शकता. हा कोर्स करून तुम्ही व्हिडिओ एडिटर, ऍनिमेटर, ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकता.
हेही पाहा –
Comments are closed.