क्रिकेट सामन्यात अपघात! ड्रिंक्स ब्रेकनंतर भर मैदानात गाडीने खेळाडूला उडवलं, नेमकं काय घडलं? पा

व्हायरल व्हिडिओ: क्रिकेटच्या जगात अनेक विचित्र घटना पाहायला मिळतात. सामन्यांदरम्यान खेळाडूंना दुखापत होणे देखील सामान्य आहे. बहुतेक खेळाडू चेंडू लागल्याने किंवा क्षेत्ररक्षण करताना जखमी होतात. पण ऑस्ट्रेलियातील एका सामन्यादरम्यान एका महिला खेळाडूला ज्या प्रकारे दुखापत झाली, त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. खरंतर, या खेळाडूला मैदानात एका गाडीने धडक मारली.

ड्रिंक्स ब्रेकनंतर भर मैदानात गाडीने खेळाडूला उडवलं

खरंतर, सध्या ऑस्ट्रेलियामध्ये 23 वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत एक सामना सुबियाको फ्लोरिएट-अ आणि मिडलँड गिल्डफोर्ड-अ (Subiaco-Floreat – A vs Midland-Guildford – A) या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यादरम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, मिडलँड गिल्डफोर्ड-अ संघ फलंदाजी करत असताना मैदानावर ड्रिंक्स ब्रेक झाला आणि पाणी मागवण्यात आली होती. सहसा क्रिकेटमध्ये गोल्फ कार्टमधून पाणी मैदानात आणले जाते. या सामन्यातही असेच काहीसे दिसून आले.

पण ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर, जेव्हा गोल्फ कार्टची गाडी मैदानातून परत जात होती, तेव्हा तिचा सुबियाको फ्लोरिएट-अ खेळाडूला (Subiaco-Floreat – A vs Midland-Guildford – A) जाऊन धडकली. टक्कर इतकी जोरदार होती की खेळाडू काही वेळ हवेत होती. सुदैवाने, या खेळाडूला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेदरम्यान, सर्व सहकारी खेळाडूंनाही धक्का बसला, परंतु जेव्हा त्यांनी पाहिले की हा खेळाडू बरा आहे, तेव्हा सर्वजण हसताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सुबियाको फ्लोरिएट-अ ने मिडलँड गिल्डफोर्ड-अ (Subiaco-Floreat – A vs Midland-Guildford – A) विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. सामन्यात मिडलँड गिल्डफोर्ड-अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांच्या सामन्यात फक्त 40.3 षटके खेळता आली आणि 168 धावा करून संघ ऑलआऊट झाला. दुसरीकडे, सुबियाको फ्लोरिएट-अ संघाने हे लक्ष्य 29.2 षटकांत फक्त 6 गडी गमावून पूर्ण केले आणि सामना 4 गडी राखून जिंकला.

हे ही वाचा –

Video : 6,6,6,6,6,6… क्रिकेटमध्ये पुन्हा वादळ; श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले 6 गगनचुंबी षटकार

India Masters Celebration : 7 दिवसांत 2 ट्रॉफी…. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टी-20 लीगमध्येही भारत ‘चॅम्पियन’, सचिन-युवीचा धमाका, पाहा सेलिब्रेशन फोटो

Video : युवराज सिंग अन् कॅरेबियन खेळाडूची भर मैदानात बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर गेले धावून; अखेर ब्रायन लारा आला अन्…

अधिक पाहा..

Comments are closed.