Live Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ


डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ

ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ

अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून जेम्स डेव्हिड व्हान्स यांनी घेतली शपथ

20/1/2025 22:30:42


राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती

20/1/2025 17:26:10


नाशिकमध्ये मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून हत्या

नाशिकरोड गंधर्वनगरी भागातील घटना

नाशिक उपनगर पोलीस घटनास्थळी पोहचले

आरोपीच्या शोधासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना

20/1/2025 17:6:22


अपुरी सुरक्षा असल्याने आरोपी शहजादने सैफच्या इमारतीची निवड केली

आरोपीने काही दिवसांपूर्वी वांद्र्यातील हॉटेलमध्ये केले होते काम

हॉटेलमधील काम संपल्यावर आरोपीकडून परिसराची रोज रेकी

डक्टमार्गे सैफचा मुलगा जहांगीरच्या बाथरूमध्ये केला प्रवेश

20/1/2025 15:48:12


कल्याणमध्ये चार बांगलादेशी महिलांवर कारवाई

स्टेशन परिसरात महिला देहविक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न

20/1/2025 15:46:38


कराड खंडणी प्रकरण, 23 जानेवारीला होणार सुनावणी

वाल्मिक कराड खंडणी प्रकरण

कराड जमीन अर्जावर 23 जानेवारीला सुनावणी

20/1/2025 15:17:3


आरजी कर प्रकरणात संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

पिडीत कुटुंबियांना 17 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

कोलकाता बलात्कार प्रकरणात सियालदाह कोर्टाने सुनावली शिक्षा

20/1/2025 15:0:9


सांगलीमध्ये निवासी शाळेतील 23 विद्यार्थ्यांना विषबाधा

विट्यातील शासकीय निवासी शाळेतील धक्कादायक प्रकार

मासांहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज

20/1/2025 14:51:57


चाकण औद्योगिक परिसरात गोळीबार

20/1/2025 14:19:46


बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल समितीचा अहवाल

बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षयचा स्वसंरक्षणासाठी एन्काऊंटर

स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षय शिंदेचा स्वसंरक्षणासाठी एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद

न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर

20/1/2025 12:59:51


मुंबई – ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मरीन ड्राईव्हच्या पंचतारांकित ट्रायडेंटमध्ये काल आढळला मृतदेह

हॉटेलच्या 27 व्या माळ्यावरील खोलीत होती महिला

20/1/2025 12:19:7


शिंदे आणि माझे नाते राजकारणापलीकडे – उद्या सामंत

आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी होणार नाही – उदय सामंत

20/1/2025 11:59:7


उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट

उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर जाऊन घेणार शरद पवारांची भेट

20/1/2025 11:52:26


धानोरे गावात हात उंचावून घेण्यात आले मतदान

मारकडवाडीनंतर आता आणखी एका गावाचा ईव्हीएमला विरोध

हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात उत्तम जानकरांना 1206 मते

विधानसभेला ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात जानकरांना 963 मते

20/1/2025 11:39:12


जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवले

जालन्यात अजित पवारांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

भोकरदन नाका परिसरात अजित पवारांना काळे झेंडे दाखवले

20/1/2025 11:29:0


बावनकुळे, महाजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार

2 पालकमंत्री रोखल्याच्या पार्श्वभूमीवर दरे गावात जाऊन घेणार भेट

20/1/2025 10:30:25


सैफ अली खान हल्लाप्रकरण

आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणले

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला वेग

20/1/2025 9:44:9


उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार जालन्यात

अजित पवार हे अर्जुन खोतकरांच्या भेटीला

20/1/2025 8:4:46


नंदुरबार शहरात दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

नंदुरबारमध्ये रात्री दगडफेक, पण परिस्थिती नियंत्रणात

नंदुरबारमध्ये त्रिकोणी इमारत परिसरात दगडफेक

शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा मारा

20/1/2025 8:2:0


खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी

जामीन मिळाला तरी वाल्मिक कराडला कोठडीच

केज कोर्टात आज व्हर्चुअल सुनावणी होणार

20/1/2025 7:42:44



Source link

Comments are closed.