Live Update : संतोष देशमुख हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीतील अधिकारी बदलले
संतोष देशमुख हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीतील अधिकारी बदलले
किरण पाटील, अनिल गुजर, अक्षय कुमार, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार हे नवे अधिकारी
– Advertisement –
बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना तपास पथकात कायम ठेवलं
13/1/2025 20:13:50
– Advertisement –
नायलॉन मांजाप्रकरणी नाशिकमध्ये आतापर्यंत 50 गुन्हे दाखल
याप्रकरणी 28 जणांना अटक करण्यात आली असून त्यात 7 पालकांचा समावेश
नायलॉन मांजा आढळल्यास पालकांवर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार
13/1/2025 18:0:6
धनंजय देशमुखांचं मस्साजोगमधील आंदोलन 4 तासांनंतर मागे
पाण्याच्या टाकीवर चढून सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे
एसपी कॉवत आणि मनोज जरांगेंच्या विनंतीनंतर देशमुखांचं आंदोलन मागे
13/1/2025 17:54:7
परळी टिप्पर अपघातातील आरोपी चालकाला जामीन मंजूर
टिप्पर चालक भोजराज देवकरला जामीन मंजूर
राख वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू झाला होता
13/1/2025 17:20:42
कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात भीषण आग
गोविंदवाडीतील 2 तबेल्यांना लागली आग
13/1/2025 16:54:4
मुख्यमंत्री फडणवीसांचा बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन
मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या तपासाचा घेतला आढावा
एकही आरोपी सुटता कामा नये
जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा
13/1/2025 16:40:48
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने दाखवला हिरवा कंदिल
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून मागे
शेतकरी आणि स्थानिकांच्या विरोधानंतर सकरकारने निवडणुकांपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा घेतला होता
13/1/2025 16:18:26
Comments are closed.