महाराष्ट्राच्या कबड्डी संघात घुसवाघुसवी
नेहमीच कामगिरीपेक्षा मोठय़ा नावांना आणि वशिलेबाजीला प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने येत्या 22 ते 27 जुलैला गुजरातमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 14 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यात 31 खेळाडूंच्या सराव शिबीरातून पुन्हा एकदा राज्य निवड चाचणी न खेळलेल्या, तसेच सराव शिबिरात फारशी चमक न दाखवलेल्या खेळाडूंची घुसवाघुसवी करण्यात आल्याचा आरोप खुद्द कबड्डीपटूंनीच केला आहे.
आकाश शिंदेवर अन्याय
नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार खेळ करणारा, अव्वल चार चढाईबहाद्दरांमध्ये असलेल्या नाशिकच्या आकाश शिंदेला संघातून डावलण्यात आले असून कामगिरीत मागे असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कामगिरीपेक्षा मोठे नाव आणि वशिला पाहण्यात आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचा संघ ः अस्लम इनामदार, अजित चौहान, आदित्य शिंदे, शिवम पाठारे, सौरभ राऊत, सौरभ फगारे, दादासो पुजारी, सुरेश जाधव, साईप्रसाद पाटील, अल्केश चव्हाण, संकेत सावंत, अनुज गावडे, जयेश महाजन, आदित्य पवार. रमेश भेंडगिरी (प्रशिक्षक), अक्षय जाधव (व्यवस्थापक).
Comments are closed.