खराब सिबील स्कोअरमुळं बँकेनं कर्ज नाकारल? या पर्यायामुळं तातडीनं कर्ज मिळणार, जाणून घ्या


खराब सिबिल स्कोअरसह कर्ज नवी दिल्ली: व्यक्तीच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात त्यावेळी व्यक्तीला तातडीनं पैशांची आवश्यकता असते. अशात एखाद्या व्यक्तीनं आपत्कालीन निधी जमा करुन ठेवला असेल त्या प्रसंगातून मार्ग निघतो. मात्र अनेक लोकांकडून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी इमरजन्सी फंड नसतो. अशा वेळी बँकांकडे जाऊन कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

बँका कर्जदाराला कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि इतर गोष्टींबाबत माहिती घेते. बँक त्या कर्जदाराचा सिबील स्कोअर पहिल्यांदा तपासते. सिबील स्कोअर खराब असल्यास बँका कर्ज देण्यास नकार देतात. मात्र, एखाद्या व्यक्तीचा सिबील स्कोअर खराब असेल तर त्याला बँका कर्ज देतात असा प्रश्न असतो. मात्र, एक पर्याय वापरुन बँकांकडून कर्ज घेता येऊ शकतं.

सिबील स्कोअर खराब असं मिळेल कर्ज

जर तुमचा सिबीली स्कोअर खराब असेल तर बँकेनं तुम्हाला कर्ज देण्यास नकार दिला असेल तर घाबरण्याची गरज नाही. यावेळी तुमच्या नावानं असलेली बँकेतील मुदत ठेव महत्त्वाची ठरेल. अधिक प्रकरणांमध्ये सिबील स्कोअर कमी असला तरी बँक एफडी तारण ठेवत कर्ज मंजूर करते. मात्र, ती कर्जाची रक्कम एफडीच्या रकमेवर अवलंबून असते.

एफडीवर मिळणारं कर्ज सुरक्षित कर्ज असतं. या प्रकरणात बँक तुमची क्रेडिट हिस्ट्री पाहत नाहीत. कारण कर्जाचं तारण तुमची एफडी असते. जर काही कारणांमुळं तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँका एफडीतून कर्जाच्या रकमेची परतफेड करुन घेतात. त्यामुळं खराब सिबिल स्कोअर असल्यास बँकाकडून मुदत ठेवीवर कर्ज काढता येऊ शकतं.

सिबिल स्कोअर सुधारण्याचा पर्याय

मुदत ठेव जितक्या रकमेची असेल त्याच्या 90 टक्के रक्कमेवर कर्ज मिळू शकतं. म्हणजेच तुमची एफडी 1 लाख रुपयांची असेल तर 90 हजार रुपये कर्ज मिळू शकतं. एफडीवर काढलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास सिबील स्कोअरमध्ये सुधारणा होऊ शकते. 100 पॉईंटनं सिबील स्कोअर सुधारता येऊ शकतो.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.