स्थानिकांच्या भावनांचा विचार व्हावा, पालकमंत्र्यांनी पत्र लिहिण्याऐवजी प्लॉट द्यावा! – आदित्य ठाकरे
कबुतरखान्यासाठी आरे कॉलनी किंवा इतरत्र जागा देण्याचा पर्याय योग्य नाही. याबाबत स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या असून दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र बसवून यावर तोडागा काढण्यात यावा, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही स्थानिकांसोबत आहोत, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्टपणे मांडली.
कबुतरखाना आहेत तिथेच ठेवावा, अशी स्थानिकांची भावना असेल तर आम्ही स्थानिकांसोबत आहोत. ते आरे कॉलनी किंवा इतर ठिकाणी तो नेण्याचा विचार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. त्यापेक्षा लोढा वरळी सीफेस येथे बंगला बांधत आहेत, तिथे कबुतरखाना करावा, हे एकदम मस्त होईल. ते लोढा आणि राजकारणी एकच आहेत की लोढा नावाचे बिल्डर आहेत, ती माहिती नाही. मात्र, त्यांनी त्याचा प्लॉट कबुतरखान्यासाठी द्यावा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
याबाबत स्थानिकांच्या भावनांचा विचार होणे गरजेचे आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी तीव्र भावना व्यक्त होत आहेत. त्यामागे प्रत्येकाचे अनुभव असतात. काही जणांना श्वसनाचा त्रास असतो, काहीजण कबुतरांना टाकलेल्या खाण्यावरून घसरून पडलेले असतात, तर काहीजणांना नेहमीच कबुतरांना देण्याची सवय असते. त्यामुळे दोन्ही बाजूंना एकत्र बसवून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. मात्र, पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहीत आहेत, हे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा त्यांनी यासाठी प्लॉट द्यावा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
कबुतरांना कंट्रोल फिडींग करण्याच्या मुद्द्याबाबत विचारले असता, ते म्हणाले कबुतरे म्हणजे मिंधेंचे आमदार नाहीत, त्यांना कंट्रोल फिडींग करता येईल. मिंधे दिल्लीला कितीवेळा गेले यापेक्षा ते गावाला किती वेळा गेले, हेपण बघा. चंद्र ज्याप्रमाणे बदलतो, त्याप्रमाणे त्यांच्या दिल्ली आणि गावाला फेऱ्या होतच असतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी हाणला.
नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आहे, तसेच आमच्या खासदारांसोबतही बैठक आहे. अनेक मित्रपक्षांचे नेते भेटतील. तसेच काही स्थानिक विषय मांडण्यासाठी काही मंत्री भेटतील का, याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बैठकीसाठी आणि स्नेहभोजनासाठी निमंत्रण आले होते. त्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत, असेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.