अंगावर खरकटे फेकल्याचा जाब विचारला; १३ जणांना अटक उरणमध्ये परप्रांतीयांच्या टोळक्याचा स्थानिक कुटुंबावर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अंगावर खरकटे फेकल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांच्या टोळक्याने बाईकवरून घरी जाणाऱ्या उरणमधील स्थानिक कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर स्कुटीचीदेखील तोडफोड केली आहे. या हल्ल्यात दाम्पत्य आणि त्यांची सात वर्षांची मुलगी थोडक्यात बचावले आहेत. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

उरण-द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० मधील निर्मला हाईट्स इमारतीसमोरील रस्त्यावरून रूपेश भोईर (३८), पत्नी रविना (३२), मुलगी रुही (७) हे रात्री स्कुटीवरून जात होते. यावेळी त्यांच्या अंगावर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून खरकटे अंगावर
पडले. याबाबत रूपेश भोईर यांनी जाब विचारल त्यावरून परप्रांतीयांच्या १३ जणांच्या टोळक्याने य कुटुंबावर लोखंडी रॉडने हल्ला करून ठार मारण्याच धमकी दिली. स्कुटीचीही मोडतोड केली. याप्रकरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी गंभी दखल घेत गुड्डू सिंह (२५), सचिन सिंह (२३), संदी सिंह (३०), धर्मेंद्र यादव (२५), पदुम पांडे (२३), राम राणा (२०), चंद्रप्रकाश यादव (१९), केशरीलाल राण (२५), संतोष यादव (२६), राजेश वर्मा (२५), ब्रिजेड आर्या (२५), बबलू चौहान (२६), भुरा चौहान (२५ यांना अटक केली आहे. हल्ल्यानंतर स्थानिकांमध्य संतापाची लाट उसळली. त्यानंतर पोलिसांपाठोपा सिडकोच्या अधिकाऱ्यांनीदेखील द्रोणागिर नोडमध्ये उभारलेल्या बेकायदा ढाबे, झोपड्यांव बुलडोझर फिरवत परप्रांतीयांना दणका दिला.

Comments are closed.