Nanded News – घराणेशाही तोंडावर पडली! एकाच कुटुंबातील भाजपच्या 6 उमेदवारांचा दारूण पराभव

नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेची निवडणूक घराणेशाहीच्या मुद्यावर चांगलीच चर्चेत होती. घराणेशाहीवरून काँग्रेसह इतर पक्षांवर टीका करणाऱ्या भाजपने एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे सर्वांच्या नजरा लोहा नगर परिषद निवडणुकीच्या निकालावर स्थिरावल्या होत्या. याचं चित्र आता स्पष्ट झालं असून भाजपने उमेदवारी दिलेले एकाच कुटुंबातील सहाच्या सह उमेदवार पराभूत झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी उभे असलेल्या भाजपच्या गजानन सूर्यवंशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला आहे.

लोहा नगर परिषदेत एकूण दहा प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी निवडणूक पार पडली. ही निवडणूक भाजपच्या एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांमुळे चर्चेत होती. मात्र, या सर्वांचाच परभाव झाल्याने स्थानिक पातळीवर उलट सुलट चर्चांना उधान आलं आहे. भाजपने लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. तसेच नगरसेवर पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे, मेहुणा युवराज वाघमारे अशा सहा जणांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, जनतेने या सर्वांना चोख उत्तर देत तोंडावर पाडलं असून त्यांचा पराभव झाला आहे.

Comments are closed.