मुंबई – गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टॅंकर पलटी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई – गोवा महामार्गावर चारवेली गावाजवळ एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर एक मार्गिका पंधरा मिनिटे बंद होती. दुसऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरु होती.

आज सायंकाळी साडे सहा वाजता हा टॅंकर चरवेली जवळ पलटी झाला. टॅंकर पलटी झाल्यानंतर त्या बाजूची वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर बाजूला करण्यात आला त्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे.

Comments are closed.