पैसे न खर्च करता पाहा IPLचा थरार! लखनऊ-दिल्ली सामना LIVE कुठे पाहणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट्

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाइव्ह अपडेट मराठीत: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आजपासून त्यांच्या आयपीएल 2026 मोहिमेची धमाकेदार सुरुवात करणार आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋषभ पंतचा मागील हंगाम फारसा चांगला गेला नव्हता, पण शेवटच्या सामन्यात त्याने 118 धावांची तुफानी शतकी खेळी करत दमदार पुनरागमनाची चाहूल दिली होती. यंदा एलएसजीने त्याला तब्बल 27 कोटी रुपयांना विकत घेतल्याने पंतवर मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी अद्याप एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही.

LSG vs DC IPL 2026 Live Update : हेड-टू-हेड आकडेवारी

लखनऊ आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. त्यापैकी दिल्लीने 4, तर लखनऊने 3 सामने जिंकले आहेत. दिल्लीविरुद्ध लखनऊचा सर्वोच्च स्कोर 209, तर लखनऊविरुद्ध दिल्लीचा सर्वोच्च स्कोर 211 इतका आहे.

LSG vs DC IPL 2026 Live Update : सामना किती वाजता सुरू होणार?

हा सामना भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होणार आहे.

LSG vs DC IPL 2026 Live Update : लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येणार?

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 HD तसेच तमिळ, तेलुगू आणि कन्नड चॅनेल्सवरही सामना पाहता येईल.

LSG vs DC IPL 2026 Live Update : मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे?

IPL 2026 चे सर्व सामने JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत.

LSG vs DC IPL 2026 Live Update : फ्रीमध्ये सामना कसा पाहाल?

DD फ्री डिश वापरणारे प्रेक्षक स्टार उत्सव मूव्हीज या चॅनेलवर हा सामना पूर्णपणे मोफत पाहू शकतात.

LSG vs DC IPL 2026 Live Update : लखनऊमधील हवामानाचा अंदाज

आजच्या सामन्यादरम्यान हलकी रिमझिम होण्याची शक्यता आहे. हवामान अहवालानुसार पावसाची शक्यता केवळ 5% आहे, त्यामुळे सामन्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

लखनौ सुपर जायंट्स लीग – (IPL 2026 LSG पूर्ण संघ)

अब्दुल समद, आयुष बडोनी, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, ऋषभ पंत (कर्ंधर), निकोलस पूरन, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश, मोहम्मद राठी, यज्ञेश राठी, प्रिन्स, यज्ञेश राठी, प्रिन्स शहीद, टी. वानिंदू हसरंगा, एनरिक नॉर्टजे, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिश.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ- (IPL 2026 DC Full Squad)

नितीश राणा, अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, केएल राहुल, कुलदीप यादव, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, समीर रिझवी, टी नटराजन, ट्रिस्टन स्टब्स, विप्रराज निगम, डेव्हिड मिलर, बेन डुक्कर, बेन डुक्कर, मिचेल स्टार्क, माधव तिवारी. लुंगी एनगिडी, साहिल पारख, पृथ्वी शॉ, काइल जेमिसन

Comments are closed.