लखनौ : विधानपरिषदेत आरक्षणावरून विरोधकांचा गोंधळ, सदस्यांनी वेलमध्ये येऊन केली घोषणा…

उत्तर प्रदेश: विधान परिषदेत आरक्षणाच्या अनियमिततेवरून विरोधी पक्षांकडून प्रचंड गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उत्तरादरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ झाला.

लेखपाल भरतीमध्ये आरक्षणाचे योग्य पालन केले गेले नाही, त्यामुळे मागासवर्गीयांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले की, “आम्ही मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणू देणार नाही आणि आरक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही.

दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही केशव मौर्य म्हणाले की, सरकार आरक्षणविरोधी नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, “सत्य ऐकण्याची हिंमत दाखवा” आणि “हिंमत असेल तर सत्य ऐका.”

या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला, मात्र केशव मौर्य यांनी सरकार कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेणार नसून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

Comments are closed.