IPL 2025: LSG लवकरच जाहीर करणार आपला कर्णधार, स्टार खेळाडूचे नाव शर्यतीत सर्वात पुढे

आयपीएलच्या लिलावात विक्रमी रकमेला रिषभ पंतला करारबद्ध करणारी लखनऊ सुपर जायंट्स ही फ्रँचायझी आज म्हणजेच 20  जानेवारी रोजी स्टार भारतीय यष्टीरक्षकाला आपला पुढचा कर्णधार बनवण्यास सज्ज झाली आहे. एलएसजीचे मालक संजीव गोएंका यांनी काहीही उघड न करता माध्यमांना विशेष मुलाखतीसाठी बोलावले आहे. या दरम्यान, संघाच्या नवीन जर्सीचेही अनावरण होण्याची शक्यता आहे.

मेगा लिलावात पंतला एलएसजीने 27 कोटी रुपयांना खरेदी केले. पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. यापूर्वी, भारतीय फलंदाज केएल राहुलने 2022 मध्ये अस्तित्वात आलेल्या या फ्रँचायझीचे तीन हंगामांसाठी नेतृत्व केले होते. तथापि, फ्रँचायझीने त्याला रिटेन केले नाही. लखनऊचा हा संघ 2024 च्या हंगामात सातव्या स्थानावर राहिला होता.

संघाने निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बदोनी आणि मोहसिन खान यांना कायम ठेवले तर डेव्हिड मिलर, मिशेल मार्श आणि एडेन मार्कराम तसेच भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अवेश खान यांच्यासाठी यशस्वी बोली लावली. लिलावानंतर, पूरन, मार्श, मार्कराम आणि मिलर यांनाही कर्णधारपदासाठी संभाव्य उमेदवार मानले जात होते. परंतु संघाला ही जबाबदारी एका भारतीय खेळाडूला द्यायची आहे. असे समजते आहे. आयपीएल 2025 पूर्वी, 10 पैकी 6 फ्रँचायझींनी त्यांचे कर्णधार जाहीर केले आहेत. ज्या संघांचे कर्णधार अद्याप जाहीर झालेले नाहीत त्यात केकेआर, आरसीबी, एलएसजी आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.

लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) पूर्ण संघ: निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, मिचेल मार्श, अब्दुल समद, आवेश खान, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग , शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग, एम. सिद्धार्थ, आकाश सिंग, शेमर जोसेफ, मॅथ्यू ब्रेट्झके, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, अर्शीन कुलकर्णी

हेही वाचा-

महिलांनंतर, पुरुष संघही विश्वविजेता, पहिल्या खो-खो वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं
VIDEO; वानखेडेच्या 50व्या वर्धापनदिनामध्ये रोहित शर्माने जिंकली चाहत्यांची मनं..!
भारताचा ‘गोल्डन बाॅय’ अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर खास क्षणांची झलक

Comments are closed.