5.42 कोटी रुपयांची आलिशान घड्याळे जप्त, अभिप्राय पाठवा

नवी दिल्ली :

दिल्लीत मंगळवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून 5.42 कोटी रुपये किमतीची लक्झरी घड्याळे आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. ही महिला हाँगकाँग येथून आली होती आणि तिच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट मिळाला असल्याचे कस्टम विभागाकडून सांगण्यात आले. जप्त सामग्रीत 1.2 किलो सोने, हिरे, 10 किलो वजनाची चांदीची भांडी, रोलेक्स, बुल्गारी, चोपार्ड, कार्टियर यासारख्या ब्रँडची लक्झरी घड्याळे अन् विदेशी चलन सामील आहे.

Comments are closed.