मध्य प्रदेशः छिंदवाडा येथे भीषण रस्ता अपघात, बस ट्रकला धडकली, 10 जण ठार, 30 हून अधिक जखमी

छिंदवाडा26 मार्च. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे गुरुवारी सायंकाळी नागपूर रोडवरील सिमरियाजवळ एका प्रवासी बसची लसणाने भरलेल्या ट्रकला धडक बसून मोठा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांनी अपघाताला दुजोरा दिला असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. बस ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भंडारकुंड येथून मोठ्या संख्येने लोक बसने आले होते. परतत असताना सिमरियाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. जिथे त्यांनी जखमींची भेट घेतली. अष्टमीच्या दिवशी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कार्यक्रमात गावातील लोकांना आणण्याची काय गरज होती, असे ते म्हणाले. याला भाजप जबाबदार आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.

Comments are closed.