फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण; गॅस काढा, गॅस काढा; गटारीतून गॅस काढा, ‘मविआ’ची विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. इराणने होमुर्झची सामुद्रधुनी बंद केल्या आणि आखाती देशांनी तेल, गॅस उत्पादनात कपात केल्याने हिंदुस्थानात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडर 115 रुपयांनी महाग झाला आहे. तसेच याआधी गॅसचे बुकिंग 15 दिवसांनी करता येत होते, मात्र आता गॅस बुकिंग 25 दिवसांनी करावे लागणार आहे.
व्यावसायिक गॅस पुरवठा होत असल्याने राज्यातील 30 टक्के हॉटेल बंद झाले आहे. जर गॅस पुरवठा झाला नाही तर येत्या काही दिवसात हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णत: बंद होतील. त्यामुळे नोकरी, शिक्षणानिमित्त परगावामध्ये राहणाऱ्या आणि खानावळी, हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारही काही स्पष्ट धोरण आखत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुधवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण; गॅस काढा, गॅस काढा; गटारीतून गॅस काढा, लाडक्या बहिणींवर गॅसवर ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.
Comments are closed.