सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता; भाजपचा करेक्ट कार्यक्रम!
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आज महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला आणि दणदणीत विजय मिळवळा. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषीकेश महेंद्र लाड हे विजयी झाले. एकूण 61 सदस्यांपैकी दोघांनाही 34 मते मिळाली.
महायुतीच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार हिंमत जाधव यांना अवघी 25 मते मिळाली. नऊ मतांनी त्यांचा पराभव झाला. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे दोन सदस्य अनुपस्थित राहिले, तर अजित पवार गटाच्या माजी खासदार संजयकाका पाटील यांचे नेतृत्व मानणाऱया दोन सदस्यांनी महायुती उमेदवारांच्या बाजूने मतदान केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड होताच आनंदोत्सव करण्यात आला. निवडी वेळी जिल्हा परिषद आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.61 सदस्य असणाऱया जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी व महायुतीत मोठी चुरस होती. अवघ्या एक-दोन मतांचा फरक असल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली. महायुती व महाविकास आघाडीने आपल्या सदस्यांना दोन दिवस अज्ञातस्थळी हलविले होते. ते सर्व सदस्य एका वाहनातून थेट जिल्हा परिषद आवारात आणि तेथून सभागृहात आले.
Comments are closed.