महाकालीचा टीझर रिलीज, तीन मिनिटांच्या व्हिडीओतून दिसला अक्षय खन्नाचा जबरदस्त अभिनय; व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
एकेकाळी चॉकलेट हिरो, त्यानंतर एक इंटेन्स विलन अशा एकाहून एक दमदार भूमिका केलेला अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या आगामी चित्रपटातून शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. महाकालीच्या निर्मात्यांनी आज अक्षय खन्नाचा ऑफिशियली लूक रिव्हिल केला असून त्यासाठी तीन मिनिटांचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. त्यातला अक्षय खन्नाचा अभिनय पाहून अंगावर काटा येतो.
महाकालीच्या निर्मात्यांनी 24 ऑगस्टला एक तीन मिनिटांचा व्हिडीओ रिलीज केला आहे. या व्हिडीओत त्यांनी अक्षय खन्नाचा शुक्रचार्यांच्या भूमिकेतील लूक समोर आणला. लांब पांढरे केस व दाढी, एक पांढरा पडलेला डोळा, कपाळाला भस्म असा लूक पाहून अक्षय खन्नाचे चाहते देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यात जेव्हा अक्षय खन्ना शेवटी एक डायलॉग म्हणतो तेव्हा अक्षरश: अंगावर काटा येतो.
व्हिडीओच्या शेवटी निर्मात्यांनी चित्रपटातील कालीमातेचा लूक देखील समोर आणला आहे. अभिनेत्री श्रीया रेड्डी देखील कालीमातेच्या भूमिकेत अगदी जबरदस्त दिसली आहे. ‘महाकाली’च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी यावर लाईक्स – कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या चित्रपटात अक्षय खन्नासह रोहित सराफ, श्रिया रेड्डी, भूमी शेट्टी, राकेश बेदी, मुरली शर्मा, नासर हे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments are closed.