महानगर गॅस लिमिटेडकडून ग्राहकांना बनावट संदेश, फसवणूक करणाऱ्या लिंक्स आणि एपीके डाउनलोड्सपासून सावध राहण्याचे आवाहन
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) आपल्या ग्राहकांना गॅस बिलाचे अपडेट्स किंवा गॅस पुरवठा तत्काळ खंडित करणे याच्याशी संबंधित असल्याचा दावा करणारे, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप यांद्वारे प्रसारित केले जाणारे फसवणुकीचे संदेश व कॉल्स, घोटाळ्याच्या लिंक्स, घातक एपीके डाउनलोड्स आणि तोतयागिरीच्या प्रयत्नांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.
अलीकडच्या काळामध्ये, अशा अनेक घटनांची नोंद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एमजीएल प्रतिनिधी असल्याचे भासवून घोटाळेबाज व्यक्ती संपर्क साधत आहेत आणि त्यांच्याकडून ग्राहकांना गॅस बिलाचे बनावट अपडेट्स आणि गॅस पुरवठा खंडित करण्याचे संदेश पाठवण्यात येत आहेत, तसेच त्यांना संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यास, एपीके फाइल्स डाउनलोड करण्यास, किंवा संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करण्यास प्रवृत्त केले जात आहे.
ग्राहकांनी संवेदनशील माहिती उघड करावी किंवा त्यांच्या डिव्हाइसेसवर मालवेअर इन्स्टॉल करावे याकरिता ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी घोटाळेबाजांकडून ग्राहकांना जाणीवपूर्वक असे संदेश पाठवण्यात येतात.
ग्राहकांना अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचा व अशा फसव्या संदेशांना प्रतिसाद न देण्याचा इशारा देण्यात येत आहे. कोणताही संशयास्पद संदेश किंवा कॉल येण्याच्या बाबतीत, ग्राहकांना एमजीएलच्या अधिकृत चॅनेल्सद्वारे थेट संपर्क साधून तत्काळ सदरची पडताळणी करण्याची विनंती करण्यात येते.
साहाय्यासाठी, संपर्क क्र. – (022) 68674500 | (022) 61564500
केवळ एमजीएलच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे संवाद साधा: +91 98992 03843 (पडताळणी केलेले ब्ल्यूटिक खाते)
एमजीएल स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की एमजीएलचे प्रतिनिधी हे कधीही फोन कॉल्स, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश या माध्यमातून तपशील, ओटीपी, कार्ड क्रमांक किंवा पासवर्ड्स अशा व्यक्तिगत आर्थिक माहितीची विचारणा करत नाहीत. ते ग्राहकांना कधीही एपीके फाइल्स डाउनलोड करण्यास आणि अज्ञात किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यास सांगत नाहीत.
एमजीएल फसवणुकीचे संदेश, लिंक्स, आणि इतर संशयास्पद डिजिटल कार्ये यांच्याविषयी सावध राहण्याबाबत विविध संपर्कव्यवहार माध्यमांमार्फत सातत्याने ग्राहकांना जागरूक करत आहे. या प्रयत्नांनंतरही, काही ग्राहक हे अजूनही अशा सायबर फसवणुकीच्या घटनांना बळी पडत आहेत. अशा घटनांच्या बाबतीत, ग्राहकांना योग्य त्या कारवाईसाठी त्वरित नजीकच्या पोलीस स्थानकाशी किंवा सायबर गुन्हे कक्षाशी संपर्क साधण्याचा व तक्रार नोंदवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Comments are closed.