Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
राजकारणात नसूनही नेहमी चर्चेत असणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी एक राजकीय बॉम्ब फोडलाय…शिवसेनेतल्या बंडावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुडी घालून शिंदेंना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी एबीपी माझावरच केला होता…आता पुन्हा एकदा २०१९ च्या राजकीय महानाट्याचा आणखी एक गौप्यस्फोट त्यांनी एबीपी माझाशी बोलतानाच केलाय. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्ट शोच्या पहिल्याच भागात अमृता फडणवीसांनी एक किस्सा सांगितला…२०१९ मध्ये विधानसभेच्या मतदानाआधीच अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडतील, अशी शंका मुख्यमंत्र्यांजवळ बोलून दाखवली होती…अमृता फडणवीसांचं हे भाकीत नंतर खरं ठरलं…पण फडणवीसांना मात्र त्यावेळी ठाकरेंवर गाढ विश्वास होता, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं…तसंच फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधला एक महत्त्वाचा फरकही अमृता फडणवीसांनी पॉडकॉस्टमध्ये सांगितलाय..
Comments are closed.