नीलम गोऱ्हेंनी सभागृहातच भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल; दिव्यांग मंत्रालयाची लक्षवेधी, नेम
महाराष्ट्र असेंब्ली मॉन्सून सत्र 2025: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज सभागृहात मंत्री अतुल सावे (Atul Save) यांना खडेबोल सुनावले. दिव्यांग मंत्रालयाच्या उभारणीसंदर्भात सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा होत असताना, संबंधित विषयाची पूर्ण माहिती नसल्याने मंत्री सावे यांनी सभागृहातच अहवाल मागवतो, असे सांगितले. यावर उपसभापती गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
आज विधान परिषदेच्या सभागृहात दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावण्यात आली होती. लक्षवेधी संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे माहिती होती. त्यामुळे त्या लक्षवेधीबदल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो, असे सभागृहात म्हटले.
नीलम गोऱ्हेंनी अतुल सावेंना सुनावले खडेबोल
यानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सभागृहामध्ये वारंवार सगळ्या सदस्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. 18 जुलैपर्यंत अहवाल मागवतो असे तुम्ही म्हटले. परंतु, मला हे कळले नाही की, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवता का? तुम्ही जर का 10 जुलैला अहवाल मागवला असता तर तुम्हाला त्यात काय कमी आहे हे बघून पुढची कार्यवाही करता आली असती. त्यामुळे तुम्ही तो अहवाल बघा आणि दहा ऑगस्टच्या आत तुमच्याच आश्वासनांची परिपूर्ती करा, असे खडेबोल त्यांनी मंत्री अतुल सावेंना सुनावले.
काय म्हणाले अतुल सावे?
यानंतर अतुल सावे म्हणाले की, आमची मागच्या आठवड्यात या संदर्भात बैठक झाली होती. मी संबंधितांना एका आठवड्याचा कालावधी दिला होता. माझ्याकडून चुकीने अठरा तारखेचा उल्लेख झाला. मात्र आम्ही आपण त्यांना सांगितले आहे की, तिसऱ्या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत आम्हाला अहवाल द्या. त्या अनुषंगाने आम्ही शुक्रवारी बैठक ठेवली आहे, असे त्यांनी म्हटले.
संजय शिरसाटांवर व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप
दरम्यान, विधान परिषदेच्या सभागृहात आज व्हिट्स हॉटेल टेंडर प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे शिरसाट यांची कंपनी संबंधित काळात नोंदणीकृत नव्हती, तरीही त्यांनी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. अशा अवस्थेत ज्याच्यामुळे ते पात्र ठरले, त्या संबंधित अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच, या प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना विरोधकांना सुनावले. “दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या,” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. मात्र, विरोधकांनी याला जोरदार आक्षेप घेतला. मंत्र्यांना अचानकपणे बोलण्याची परवानगी नाही, त्यासाठी आधी नोटीस दिली पाहिजे, असे म्हणत विरोधकांनी गोंधळ सुरु केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.