Rohit Pawar – Ajit Pawar – Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

Rohit Pawar – Ajit Pawar – Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामती येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बारामती येथे पवार कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या विद्या प्रतिष्ठानद्वारे स्थापन करण्यात आलेल्या ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या उद्घाटनासाठी गौतम अदानी (Gautam Adani) बारामती येथे आले होते. गौतम अदानी बारामती विमानतळावर (Baramati Airport) आले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावर गौतम अदानी दिसताच अजित पवार हे पुष्पगुच्छ घेऊन पुढे सरसावले. अदानी समोर चालत येत असताना दिसताच अजित पवार (Ajit Pawar) यांनी लांबून त्यांना हाक मारली. ‘गौतमभाईSSS वेलकम टू बारामती’, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर गौतम अदानी यांनी अजित पवारांचे आभार मानले. यानंतर अजित पवार आणि गौतम अदानी यांच्यात जुजबी बोलणे झाले. आपण इथूनच थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचे ना, असा प्रश्न अजितदादांनी विचारला. त्यावर गौतम अदानी यांनी होकार दर्शवला. यावेळी गौतम अदानी यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. तेव्हा अजितदादांनी, ‘आपण चौघे एकाच गाडीतून जाऊ, रोहित आपल्यासोबत येईल’, असे अजित पवार यांनी सांगितले. यानंतर हे सर्वजण एकाच गाडीत बसले. ही गाडी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चालवत होते. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अजित पवार यांनी अत्यंत उत्साहाने केलेल्या अदानींच्या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Comments are closed.