SSC Result – दहावीच्या निकालाचेही ‘बारा’ वाजले; 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 2.01 टक्के घसरण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही घसरण झाली असून 92.09 टक्के विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 2.01 टक्के घसरण झाली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 94.10 टक्के, तर 2024 मध्ये गेल्या वर्षी 95.81 टक्के एवढा लागला होता.
दहावीच्या परीक्षेसाठी 9 मंडळातून 16 लाख 64 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 60 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा 94.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 89.56 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. यात कोकण विभाग 97.62 टक्क्यांसह सरस ठरला असून सर्वात कमी 88.41 टक्के निकाल छत्रपती संभाजीनगरचा लागला आहे.
यंदा 4 लाख 82 हजार 264 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, 4 लाख 22 हजार 891 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये, 3 लाख 80 हजार 437 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आणि 1 लाख 34 हजार 934 विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 6 हजार 612 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली होती आणि 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
येथे पहा निकाल
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
परीक्षा/महाराष्ट्र-एसएससी-10-निकाल
शाळांसाठी – mahahsscboard.in (in school login)
Comments are closed.