Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर… 

Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी

Donald Trump America Iran War नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले झाल्यानंतर अमेरिकेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले. इराणवर हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता शांतता करार संपला आहे. इराणसोबत चर्चा होणार नाही, असं म्हटलं.  आज रात्री इराणवर विध्वसंक हल्ला केला जाऊ शकतो, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यानंतर इराणनं देखील अमेरिका आणि आखाती देशांना विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. यामुळं ट्रम्प यांच्या धमकीनुसार अमेरिका इराणवर हल्ले करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी

आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. एफडीएच्या पथकाने एकाच दिवशी तब्बल 16 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर अचानक छापेमारी (Raids) केली. या धडक कारवाईत मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ‘रुस्तम आईस्क्रीम’ (Rustom Ice Cream) दुकानाला मोठा दणका देत त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

Comments are closed.