Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर…

Maharashtra Breaking LIVE News Updates Today 1st December 2025: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर… 

राज्यभर चर्चेत असलेल्या अन गार्डन नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी"मजकूर-संरेखित: justify;">अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित (Angar Nagarpanchayat Election Postponed) करण्यात आली आहे. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर येथील दहशतीची मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक कधी होईल, याबाबत आज सविस्तर स्पष्टता येईल.

शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती

नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे. अशातच काल (30 नोव्हेंबर) रात्री सांगोल्याचे (Sangole) माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने (Election Commission) छापा टाकला आहे. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे (मराठी Shivsena) कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत. सांगोल्यात (Sangola Election) भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले आहे. यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजीबापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच काल ( रविवारी) दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

Comments are closed.