Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील घडामोडी एका क्लिकवर…

महाराष्ट्र ब्रेकिंग लाइव्ह अद्यतने 28 एप्रिल 2025: कश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तब्बल 28 पर्यटकांचे प्राण घेतले. या घटनेनं संपूर्ण देश हळहळला आणि दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्याचा बदला घेण्याची मागणी सरकारकडे करू लागला. अशातच पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं कठोर कारवाई करत सातत्यानं दहशतवादाला पाठींबा देणाऱ्या पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे.

सिंधू कराराला केंद्र सरकारकडून स्थिगिती देण्यात आलीय, तर पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. (Pahalgam Terror Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आली असून  मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला.

पहलगाम हल्ल्यनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवरह लक्ष राहिल, बीड संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच, राज्यातील राजकीय घडामोडींवरही आज दिवसभरात लक्ष राहील…

Comments are closed.