Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

इराणने शब्द पाळला, दोन भारतीय LPG टँकर्सना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी

Iran Israel War : पश्चिम आशियात तणाव वाढला असताना भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इराणनं भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून दोन एलपीजी टँकर नेण्याची परवानगी दिली आहे. इराणच्या भारतातील राजदूतांनी यासंबंधी वक्तव्य केल्यानंतर काहीच तासांमध्ये हा निर्णय झाला आहे. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे देशात निर्माण झालेली तणावाची स्थिती काहीशी निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धामुळे इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्याचा परिणाम भारतात झाला असून देशांतर्गत इंधनाचा पुरवठा अपुरा पडताना दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर भारतात व्यावसायिक गॅसच्या पुरवठा बंद करण्यात आला असून घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. आता इराणमधून येणाऱ्या टँकर्समुळे या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. एलपीजी पुरवठ्याबाबत देशात चिंता व्यक्त होत असताना हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

अमेरिका- इराण युद्धामुळं इंडिगोकडून इंधन अधिभार, 425 ते 2300 रुपयांनी तिकिट दर वाढले, मध्यरात्रीपासून दर लागू 

 

Comments are closed.