Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, अपडेट्स एका क्लिकवर…
<एच 3 शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर…
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात?
सरकारने जाहीर केलेल्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले.. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.मात्र या मेळाव्यानंतर आता भाजपच्या गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेते आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केलाय..गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा ठाकरेंचे आमदार खासदार भाजपच्या गळाला लागणार का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे… तर महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावला.
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल. ठाकरे बंधू कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले आहेत कळल्यावर पुढील निर्णय घेऊन अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
ठाकरेंच्या मेळाव्यावर प्रताप सरनाईक काय म्हणाले?
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली..यावेळी सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक भावनिक पत्र लिहलं आणि त्या पत्रातून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय.. मराठीच्या हितासाठी एकत्र आहोत असे सांगणारे काही वर्षांपूर्वी वेगवेगळे झाले ते कोणाच्या हितासाठी असा सवाल यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला.. तर दोन्ही ठाकरे बंधूंचा महापालिकेच्या तिजोरीत आत्मा अडकल्याचा आरोप करत सरनाईकांनी हल्लाबोल केलाय.
Comments are closed.