Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…
विनामूल्य बातम्या: विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलाचा मृत्यू. निलंगा तालुक्यातील गुंजरगा जिल्हा परिषद शाळेतील घटना. संमेलनाची तयारी सुरू असताना झालेली घटना. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूर जिल्ह्यातील गुंजरगा या गावातील जिल्हा परिषद शाळेत आज एक धक्कादायक घटना घडली आहे.कृष्णा दत्ता शिंदे वय 12 वर्षे आज शाळेमध्ये उत्साहाने दाखल झाला होता. आज शाळेत स्नेहसंमेलन होतं. स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होती. लाईटची सोय करण्यासाठी वायरिंग करण्यात आली होती. चुकून लोखंडी खंबात वीज उतरली होती.. कृष्णा शिंदे या विद्यार्थ्यांचा त्या लोखंडी खांबाला हात लागला.. विजेचा जोरात झटका बसला. आजूबाजूला हजर असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. कृष्णा शिंदे ला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर कृष्णा शिंदे मृत असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळतच संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे..
Comments are closed.