Maharashtra Budget 2025 Ajit Pawars announcement regarding the states new housing policy to be announced soon


उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यासंदर्भात घोषणा केली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई : विधानसभा आणि विधान परिषदेत आज (10 मार्च) राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यासंदर्भात घोषणा केली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Budget 2025 Ajit Pawars announcement regarding the states new housing policy to be announced soon)

सर्वांसाठी घरे हे उद्दीष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 44 लाख 7 हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहिणींसाठी 36 हजार कोटी प्रस्तावित, 2100 रुपये कधी? अजित पावरांनी दिले उत्तर

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती देताना अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत सन 2024-25 करीता 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सुमारे 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 14 लाख 71 हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. त्यांनी पुढे म्हटले की, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पावर म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना शहरी-1 अंतर्गत 4 लाख 42 हजार 748 घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 8 हजार 304 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी-2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी 5 लाख घरकुलांचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली.

हेही वाचा – Maharashtra Budget 2025 : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गाबाबत अजित पवारांची माहिती



Source link

Comments are closed.