Maharashtra Budget 2025 DCM Eknath Shinde reaction on this budget


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (10 मार्च) विधिमंडळात राज्याचे अर्थसंकल्प सादर केले. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आले आहेत. यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली असून हे एक चॅम्पियन बजेट असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. “गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना तसेच पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट अजित पवारांनी मांडले आहे” अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू आहे. तसेच, महाराष्ट्र आता थांबणार नाही, हा निर्धार आजच्या अर्थसंकल्पातून व्यक्त होतो आहे. शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांनी यावेळेसदेखील हा अर्थसंकल्प मांडतांना समतोल राखत सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Maharashtra Budget 2025 DCM मराठी reaction on this budget)

हेही वाचा : Maharashtra Budget 2025 : वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, बजेटमधून ही घोषणा 

“अमेरिकेसारख्या प्रगत देशाचा विकास हा रस्त्यांमुळे झाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगली तरतूद केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात एकही क्षेत्र सोडलेले नाही. औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून तो आणखीही पुढे राहील त्याचप्रमाणे गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर येईल अशा तऱ्हेने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली. “मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची (MMR) क्षमता दीड ट्रिलियन डॉलर्स योगदानाची आहे. समृद्धी, अटल सेतू सारखे गेम चेंजर प्रकल्प गेल्या अडीच वर्षांत पूर्ण झाले आहेत. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आणखी लाभ होईल. अडीच वर्षांपासून आपण सिंचनाच्या प्रकल्पांना वेग दिला असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उचललेली पावले अतिशय महत्त्वाची आहेत.” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“गरीब, दुर्बल महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेतून पैसे देऊन आम्ही थांबलेलो नाहीत तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला होता मात्र आम्ही या योजनेसाठी बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद करून बहिणींना मदत करण्याचा आमचा निर्धार कायम ठेवला आहे,” असेही ते पुढे म्हणाले. “कोणत्याही प्रकारे या अर्थसंकल्पात योजनांना कात्री लावलेली नाही. उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना या बजेटमध्ये वेग देण्यात आलेला आहे.” विकास हाच आमचा अजेंडा असून लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. विकसित भारत घडवण्यामध्ये विकसित महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे,” असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



Source link

Comments are closed.