Maharashtra Budget 2025 FM Ajit Pawar announcement and car buying will get costlier


मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (10 मार्च) विधिमंडळात अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. पण, या अर्थसंकल्पात अशा काही निर्णयांची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसू शकतो. देशभरात काही दिवसांपूर्वी एचएसआरपी (HSRP) म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली. पण, महाराष्ट्रात या एचएसआरपी नंबर प्लेटच्या दरावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. आता मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये मोटार वाहन करात वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे वाहन घेण्याचे स्वप्न महागणार आहे. (Maharashtra Budget 2025 FM Ajit Pawar announcement and car buying will get costlier)

हेही वाचा : Maharashtra Budget 2025 : वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, बजेटमधून ही घोषणा 

अर्थसंकल्पामध्ये मोटार वाहन करात एका टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका चारचाकी वाहनांच्या खरेदीवर बसणार आहे. सध्या खासगी मालकीच्या चारचाकी सीएनजी (CNG) तसेच एलपीजी (LPG) वाहनांवर गाड्यांचे प्रकार आणि किंमतीनुसार 7 ते 9 टक्के कर आकारला जातो. या करामध्ये एका टक्क्यांने वाढ करण्यात आली असून याचा मोठा फटका वाहणा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे. राज्य शासनाकडून असे सांगण्यात आले आहे की, एलपीजी वाहनांवरील मोटार वाहन सदर दरवाढीमुळे राज्यास 2025-26 मध्ये सुमारे 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. राज्यात 30 लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. या मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, कमाल मर्यादेतील प्रस्तावित वाढीमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 170 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे सरकारला अपेक्षित आहे.

फक्त इतकेच नव्हे तर, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना एकरकमी वाहन किंमतीच्या 7 टक्के दराने मोटार वाहन कर आकारला जाणार आहे. प्रस्तावित वाहन कर सुधारणेमुळे राज्याला 180 कोटी अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तर राज्यात 7500 किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर (LGV) अनिवार्यपणे एकरकमी वाहनांच्या किंमतीच्या 7 टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे सन 2025-26 मध्ये राज्याला सुमारे कर 625 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.



Source link

Comments are closed.