Maharashtra Budget 2025 Uddhav Thackeray meet Chief Minister Devendra Fadnavis Eknath Shinde was ignored


मुंबई – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभागृहातून बाहेर पडताना लॉबीमध्ये भेट झाली. आजी – माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेंकाना नमस्कार केला. त्यासोबतच मिश्किल टोलेबाजी देखील केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील फडणवीसांच्या मागेच होते. मात्र ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणेही पसंत केले नाही. दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची नजरानजर देखील झाली नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे सपशेल दुर्लक्ष केले.

काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही

अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याचवेळी शिवसेना (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची गाठ पडली. यावेळी त्यांनी एकमेकांना नमस्कार केला. उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले की, काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही. तर, अजित पपवारांना म्हणाले की दादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही, असे म्हणत अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.

ठाकरे आणि फडणवीस यांची लॉबीमध्ये भेट झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मागेच होते. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नजरानजर देखील झाली नाही.

मर्सिडिज भावाचा मुद्दा काय?

नुकताच दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे झाले. या संमेलनात ‘आम्ही असे घडलो’ या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुलाखत झाली होती. या मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांनी एकत्रित शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवर केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गोऱ्हेंनी मला तसा काही अनुभव नाही, मी तसं ऐकलं होतं, असा खुलासा केला होता.

हेही वाचा : Rohit Pawar : रवींद्र धंगेकरांनी तीन-चार वर्षांचा नाही तर 30-40 वर्षांचा विचार करावा; रोहित पवारांचे आवाहन 



Source link

Comments are closed.