Maharashtra Budget 2026 – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, ६ मार्चला सादर होणार अर्थसंकल्प
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. विधिंमडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव संमत करण्यात येईल. यावेळी प्रत्येक पक्षांच्या गटनेत्यांना आणि तीन सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यात येणार आहे.
Comments are closed.