Maharashtra cabinet minister portfolio allocation chief minister devendra fadnavis said will be done soon


नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरात लवकर म्हणजे आज (शनिवारी) रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. महायुती सरकारचे खातेवाटप अंतिम झाल्याचे संकेत फडणवीस यांनी यावेळी दिले. (maharashtra cabinet minister portfolio allocation chief minister devendra fadnavis said will be done soon)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाविषयी माहिती दिली.

– Advertisement –

शिंदे नगरविकास, अजित पवार वित्त आणि नियोजन

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे सामान्य प्रशासन, गृह ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग ही खाती दिली जाणार आहेत. एकनाथ शिंदे स्वतःकडे नगरविकास विभाग ठेवणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याचे समजते. मात्र, भाजप, वित्त आणि नियोजन खाते स्वतःकडे ठेवून अजितदादांना महसूल खाते देणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – Winter Assembly Session 2024 : अधिवेशनाचे सूप वाजले; आठवड्याभरात दोन्ही सभागृहात किती तास काम?

– Advertisement –

शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांना उद्योग किंवा गृहनिर्माण, प्रताप सरनाईक यांना परिवहन, भरत गोगावले यांना रोजगार हमी आणि फलोत्पादन, प्रकाश आबिटकर यांना शालेय शिक्षण किंवा सार्वजनिक आरोग्य, संजय शिरसाट यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता, गुलाबराव पाटील यांना सामाजिक न्याय ही खाती मिळणार असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीमधील काही मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्याने या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच महायुतीमधील अनेक आमदार नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात उपस्थित देखील राहिले नाहीत. तर दुसरीकडे महायुती सरकारचं खातेवाटप लवकर न झाल्यामुळे हे हिवाळी अधिवेशन बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

शहरी नक्षलवादासंबंधीच्या एका प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर दिले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत 180 संघटना काम करत होत्या. त्यातील काही संघटना या शहरी नक्षली संघटना म्हणून कार्यरत होत्या. तत्कालीन यूपीए सरकार आणि माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी शहरी नक्षली संघटनांबाबत जी माहिती दिली, त्याच माहितीच्या आधारे मी विधानसभेत या संघटना काम करत असल्याचे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. बीडच्या प्रकरणात सरकार कुणालाही सोडणार नाही. तसेच परभणीच्या घटनेत सत्य बाहेर यावे म्हणून न्यायालयीन चौकशी जाहीर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (maharashtra cabinet minister portfolio allocation chief minister devendra fadnavis said will be done soon)

हेही वाचा – Neelkamal Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला; मृतांचा आकडा 15 वर


Edited by : Ashwini A. Bhatavdekar



Source link

Comments are closed.