मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर धमकीची मॅसेज आला आहे. पाकिस्तानी नंबरवरून हा मॅसेज पाठवण्यात आला. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाबाज हुमायून राजा असे मॅसेज करणाऱ्याचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत. धमकीचा मॅसेज आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालय, त्यांचे निवासस्थान आणि इतर प्रमुख सरकारी आस्थापनांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मॅसेज पाठवणाऱ्या व्यक्तीबाबतही पोलीस माहिती घेत आहेत.

Comments are closed.