महाराष्ट्र दुष्काळ : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहा यांच्या भेटीत काय झाले?

  • अमित शहांकडून मदतीचे आश्वासन
  • 265 तालुक्यांत दुष्काळ
  • केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार आहे

 

महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत आणि केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत चर्चा झाली.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड (NDRF) अंतर्गत महाराष्ट्राला जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी फडणवीस यांनी केंद्राकडे केली.

फडणवीस यांनी अमित शहा यांना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची स्थिती आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्य सरकारच्या वतीने केंद्राला निवेदनही देण्यात आले.

 

265 तालुक्यांत दुष्काळ

महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाअभावी अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध सवलती आणि मदतीच्या उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारची मदत दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र-राज्य समन्वयाची गरज आहे.

वाशिम न्यूज : मच्छीमारांना मदत करण्याचे मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा

केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार आहे

दरम्यान, दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हे पथक 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या पाहणीच्या आधारे दुष्काळाची तीव्रता आणि नुकसानीचे मुल्यांकन करून केंद्राकडून मदतीबाबत निर्णय घेतला जाईल.

टोरेंट प्रकल्प : 'ग्रामीण शेतकरी' या शब्दावरून वाद पेटला… कर्जतमध्ये भूसंपादनाच्या सुनावणीत मोठा गदारोळ! थेट जनसुनावणी बंद होती

अमित शहांकडून मदतीचे आश्वासन

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकार राज्याला आवश्यक ती सर्व मदत करेल, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीनंतर फडणवीस यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून महाराष्ट्रासाठी केंद्राकडे जास्तीत जास्त मदतीची मागणी केल्याची माहिती दिली. केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनीही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Comments are closed.