Maharashtra Election 2025 – नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करत बिगुल वाजवला आहे. यासाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. यामुळे राज्यात या महिन्यात निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची माहिती दिली. निवडणुकांची घोषणा होताच संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेबाबत राज्य निवडणूक आयोगाने आजच दोन आदेश जारी केलेले आहेत.
निवडणुकीस पात्र असलेल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. एकूण ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवड होणार आहे. २४६ नगरपरिषदांमध्ये १० नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे. आणि २३६ नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
राज्यात एकूण १४७ नगरपंचायती आहेत. त्यापैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये १५ नवनिर्मित नगरपंचायती आहेत. आणि २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वी संपलेली आहे. आणि उर्वरित १०५ नगरपंचायतींची मुदत समाप्त झालेली नाही. नगरपरिषदेसाठी साधारण सदस्य संख्या ही २० ते ७५ एवढ आहे. आणि नगरपंचायतीसाठी सदस्य संख्या ही १७ आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे. आणि नगरपरिषदेत साधारणतः एका प्रभागात दोन जागा असतात. पण नगरपरिषदेच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदेत एका प्रभागामध्ये तीन जागा असतात. म्हणजे मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागले. या शिवाय नगरपरिषदेच्या एका अध्यक्षासाठी मतदान करावं लागेल.
नगरपंयातमध्ये फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष असतो. यासाठी मतदारांना दोन मतं द्यावी लागतील. राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त ४ अर्ज दाखल करता येतील. संकेत स्थळावर उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवाराला द्यावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मात्र ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना ज्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाहीये त्यांना अर्ज केलेल्याची पावती सादर करून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. असा उमेदवार निवडून आला तर त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदार यादीसंदर्भात ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आणि मतदान केंद्र निहाय मतदान याद्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण मतदार १ कोटी ७ लाख ३५७६ इतके आहेत. आणि त्यासाठी एकूण १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशी ईव्हीएम मशिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका ईव्हीएमवरच होणार आहेत. आणि त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. ती पुढील प्रमाणे –
> अ वर्ग नगरपरिषदसाठी अध्यक्षपदासाठी १५ लाख, सदस्यपदासाठी ५ लाख,
> ब वर्ग नगरपरिषदसाठी अध्यक्षपदासाठी ११ लाख २४ हजार, सदस्यपदासाठी ३ लाख ५० हजार
> क वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० हजार, सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार
> नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी ६ लाख आणि सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार इतकी खर्च मर्यादा आहे.
मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाइल नेता येईल. मात्र, प्रत्यक्ष मतदान केंद्रामध्ये मोबाइल नेता येणार नाही, तेथील इमारतीमध्ये नेता येईल. आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक सुविधा उपलब्ध केलेली असेल तिथे मोबाइल ठेवता येईल. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते या संदर्भात निर्णय घेतील. की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाइल नेण्याची सुविधा उपलब्ध करून देता येईल.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८८ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतदान आणि मतमोजणी कर्मचाऱ्यांसह एकूण ६६ हजार ७७५ निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी एकूण पुरुष मतदार ५३ लाख ७९ हजार ९३१, महिला मतदार ५३ लाख २२ हजार ८७० आहेत. आणि इतर मतदार म्हणजे ट्रान्सजेंडर ह ७७५ आहेत. असे मिळून एकूण मतदार १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ आहेत. १३ हजार ३५५ केंद्रावर या निवडणुकीत मतदान होईल.
२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. एकूण २८८ अध्यक्षपदांच्या जागा आहेत. एकूण प्रभाग ३८२० आहेत. एकूण सदस्य संख्या ६८५९ इतकी आहे. त्यापैकी महिलांसाठी ३४९२ प्रभाग आरक्षित आहेत. अनुसूचित जातीसाठी ८९५ जागा आहेत. त्यापैकी ४९८ महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी ३३८ जागा म्हणजे सदस्यपद आहेत. त्यापैकी १८७ महिलांसाठी राखीव आहेत. मागासवर्ग प्रवर्गासाठी १ हजार ८२१ जागा आहेत. त्यापैकी १००५ महिला असतील. आणि सर्वसाधारण ३८०५ जागा असतील त्यापैकी १८०२ महिला असतील.
विभागनिहाय नगपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका –
कोकण विभाग – २७
नाशिक विभाग – ४९
पुणे विभाग – ६०
छत्रपती संभाजीनगर विभाग – ५२
अमरावती विभाग – ४५
आणि नागपूर विभाग – ५५
असा असेल निवडणूक कार्यक्रम –
१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल
१८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी
२१ नोव्हेंबरला अर्ज माघारीसाठीची मुदत (अपील नसलेल्या ठिकाणी)
२५ नोव्हेंबरला अर्ज माघारीसाठीची मुदत (अपील असलेल्या ठिकाणी)
२६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी
२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी
१० डिसेंबरला शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध होणार
Comments are closed.