Maharashtra Gaurdianship list declared by Mahayuti Govt
मुंबई : अखेर महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदाची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या बीडचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. बीडमध्ये गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनानंतर बीडचे पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांच्याकडे देऊ नये, अशी मागणी केली जात होती. अशामध्ये आता अखेर राज्य सरकारने बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच, 3 मंत्र्यांकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे. (Maharashtra Guardian Minister list declared by Mahayuti Govt)
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घ्यायचाय? जाणून घ्या कसा कराल अर्ज
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सर्व पक्षीय नेत्यांनी आरोप केले होते. भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे तसेच इतर काही नेत्यांनी धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आल्याचे पाहायला मिळाले असून या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रिपदाची अपेक्षा होती. त्यांनी अनेकदा आपल्या विधानांमधून अशी इच्छा व्यक्त केली होती. अशामध्ये आता त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद दिल्यानंतर भरत गोग्वले यांना डावलून अदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री, #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. pic.twitter.com/vS41qTcot4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 18, 2025
या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद या मंत्र्यांकडे
देवेंद्र फडणवीस – गडचिरोली
एकनाथ शिंदे – ठाणे, मुंबई शहर
अजित पवार – बीड, पुणे
पंकजा मुंडे – जालना
आशीष शेलार – मुंबई उपनगर
अदिती तटकरे – रायगड
उदय सामंत – रत्नागिरी
नितेश राणे – सिंधुदुर्ग
नरहरी झिरवाळ – हिंगोली
प्रताप सरनाईक – धाराशीव
संजय शिरसाट – संभाजीनगर
चंद्रशेखर बावनकुळे – अमरावती, नागपूर
आकाश फुंडकर – अकोला
राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
बाबासाहेब पाटील – गोंदिया
हसन मुश्रीफ – वाशीम
चंद्रकांत पाटील – सांगली
गिरीश महाजन – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ
गणेश नाईक – पालघर
अतुल सावे – नांदेड
डॉ. अशोक उईके – चंद्रपूर
जयकुमार रावल – धुळे
माणिकराव कोकाटे – नंदुरबार
जयकुमार गोरे – सोलापूर
संजय सावकारे – भंडारा
मकरंद जाधव – बुलढाणा
शंभूराज देसाई – सातारा
प्रकाश आबिटकर – कोल्हापूर
गुलाबराव पाटील – जळगाव
मेघना बोर्डीकर – परभणी
पंकज भोयर – वर्धा
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर (सह-पालकमंत्री)
माधुरी मिसाळ – कोल्हापूर (सह-पालकमंत्री)
आशिष जयस्वाल – गडचिरोली (सह-पालकमंत्री)
Comments are closed.