महाराष्ट्राच्या मुलींना सुवर्ण; मुलांना रौप्य

बंगळुरू येथे पार पडलेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित 69 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स (19 वर्षांखालील) बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले, तर मुलांच्या गटात महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत मुलींच्या गटात सहाव्या फेरीत श्रावणी उंडाळे, अनुष्का कुतवळ, श्रुती काळे, दिया पाटील यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 3.5-0.5 अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. यामध्ये महाराष्ट्र संघाने सहाव्या फेरीअखेर सर्व फेर्यांमध्ये विजयी कामगिरी करत एकूण 6 गुणांची कमाई केली. मुलांच्या गटात अखेरच्या फेरीत सुयोग वडके, गौरांग बागवे, अरविंद अय्यर, अर्णव कदम यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सीबीएससी संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले.

Comments are closed.