महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची आगेकूच

गतविजेत्या महाराष्ट्राच्या मुली व मुले या दोन्ही खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत प्रतिस्पर्धी संघांचा धुव्वा उडवित सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या विजयासह आगेपूच केली. मुलींच्या विभागात महाराष्ट्राने यजमान बिहारचा 61-15 असा 46 गुणांची धुव्वा उडवित दणदणीत विजय मिळविला. अमृती पाटील हिने 10 खेळाडू टिपत सर्वाधिक 20 गुणांची कमाई केली. प्रीती ढाकर्गे हिने पहिल्या डावात नाबाद 1 मिनिटे 20 सेकंद, तर दुसऱया डावात 3 मिनिटे 40 सेकंद पळती केली. शिवाय आक्रमणातही 8 गुणांची कमाई करीत अष्टपैलू खेळ केला. मैथेली पोवार हिनेही संरक्षणात नाबाद 2 मिनिटे 40 सेकंद पळती करत आक्रमणातही 4 गुण मिळवित अष्टपैलू चमक दाखवली. श्रद्धा नागदिवे हिने आक्रमणात 8 गुणांची कमाई केली. बिहारकडून शृती सिंग (नाबाद 1.20 सेकंद पळती व आक्रमणात 2 गुण) व अनमोल कुमारी (आक्रमणात 4 गुण) यांनीची काय तो थोडाफार प्रतिकार केला.


Comments are closed.