Maharashtra government 100 days report card eknath shinde ajit pawar and devendra fadnavis department failed


राज्य सरकारकडून 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल अर्थात प्रगती पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केले आहे. या यादीत एकूण राज्यातील ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे.

Maharashtra Report Card मुंबई : राज्य सरकारकडून 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल अर्थात प्रगती पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केले आहे. या यादीत एकूण राज्यातील ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन विभाग नापास झाल्याचं प्रगती पुस्तकात पाहायला मिळत आहे. (maharashtra government 100 days report card eknath shinde ajit pawar and devendra fadnavis department failed)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केलेल्या प्रगती पुस्तकानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग 80 टक्के गुणांसह सर्वोत्तम ठरला आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, 48 विभागातील तीन विभाग नापास झाले आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास या विभागांचा समावेश असून या तीन विभागांची कामगिरी ढिसाळ असल्याचे समोर आले आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळातील सामान्य प्रशासन हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. नगरविकास हे खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तसेच, अन्न-नागरी पुरवठा हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. या विभागांची 100 दिवसांच्या कृती आरखड्यानुसारची कामगिरी ढिसाळ झाली आहे. या तिन्ही विभागांना 35 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहे.

तीन विभागाल किती गुण?

  1. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के
  2. नगरविकास विभागाला 34 टक्के
  3. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्के

12 विभागांना शंभर टक्के गुण –

सरकारच्या 100 दिवसांच्या कामांत मंत्रिमंडळातील 12 विभागांना 100 टक्के गुण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 12 विभागांनी ठरवलेल्या मुद्यांवर शंभर टक्के काम केलं आहे. जलसंपदा, गृह,ग्रामविका, पशुसंवर्धन, बंदरे, उच्च व तंत्रशिक्षण, कामगार, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक, खणीकर्म, दुग्धव्यवसाय या विभागांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.


हेही वाचा – Devendra Fadnavis : सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल समोर; कोण पास-नापास? वाचा सविस्तर



Source link

Comments are closed.