बिबट्यांच्या नसबंदीला राज्य सरकारडून परवानगी, जेरबंद करण्यासाठी AI चा वापर होणार

बिबट्याच्या हल्ल्यात जुन्नर, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या भागांत गेल्या दोन महिन्यांत चौदा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, तसेच मंत्री गणेश रामचंद्र नाईक यांनी बैठक घेतली. यात बिबट्यांची नसबंदी करणे आणि ते जंगलातून बाहेर आले की त्यांना पकडणे यावर चर्चा झाली.

वन विभागाला केंद्र सरकारकडून दिलेल्या अटींनुसार परवानगी मिळाली आहे आणि तीही केवळ जुन्नर विभागासाठी,” अशा माहिती रामचंद्र नाईक यांनी दिली. तसेच सर्व विभागांसाठी परवानगी मागणार असून सध्या उपलब्ध 200 पिंजऱ्यांव्यतिरिक्त आणखी 1 हजार पिंजरे उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून बिबट्यांना पकडता येईल.सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे बिबट्यांच्या हालचालींबद्दल गावकऱ्यांना सतर्क करता येईल.सॅटेलाइटचा वापर आणि AI च्या मदतीने जर बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला तर तीन किलोमीटरच्या परिसरात सायरन वाजेल,” असे नाईक म्हणाले.

जुन्नरमध्ये गेल्या दोन महिन्यांत बिबट्यांनी तीन जणांचा बळी घेतला. नाशिक आणि अहिल्यनगर जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपासून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या भागांत ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबटे उसातून बाहेर येऊन केव्हाही हल्ला करू शकतात, अशी भीती गावकऱ्यांमध्ये आहे.

याशिवाय बिबटे रहिवासी भागात प्रवेश करू लागले आहेत. गणेश नाईक यांचे मत आहे की शहरीकरणासाठी झाडांची कत्तल आणि धरणांच्या बांधकामामुळे अनेक बिबटे जंगलाबाहेर पडून मानवी वस्तीत येत आहेत.

“जुन्नर आणि शिरूर परिसरात चिलेवाडी, माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे यांसारख्या धरणांचे बांधकाम झाले. तसेच या भागात शहरीकरण वाढले आहे,” असे नाईक म्हणाले. “मानवी वस्तीत बिबट्यांचे येण्यामागील कारण म्हणजे घरांच्या आसपास असणारे जनावरं, कुत्री, कुक्कुटपालन व इतर लहान जीव,” असेही त्यांनी पुढे सांगितले.

Comments are closed.