सरकारी कर्मचाऱ्यांची हिंदी परीक्षा रद्द!

हिंदी भाषकांना खूश करण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा सक्ती लांबणीवर टाकली. त्यानंतर आता राज्य सरकारने मराठी माणसाला खूश करण्यासाठी सरकारी कर्मचाऱयांसाठीची हिंदी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषा विभागाने यासंदर्भात  जीआर जारी केला आहे. भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा कायमची रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा  1976 पासून सरकारी कर्मचाऱयांसाठी अनिवार्य होती. हिंदी भाषेचा शासकीय कामकाजातील वापर अत्यंत नगण्य असल्याने ही परीक्षा ठेवणे संयुक्तिक नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.