सर्व बँकांची पीक कर्जे माफ
शेतकरी कर्जमाफीबाबत कोणताही संभ्रम नाही. ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पात केलेल्या कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळणार याविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात होते. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, ‘‘2 लाखांपर्यंत कोणतीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणीही दिलेले पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत.’’
Comments are closed.